breaking-newsTOP Newsआरोग्यताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुंबईत 7,410, पुण्यात 9,841 नवे रुग्ण; राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 40,94,840 वर

मुंबई – राज्यात कडक निर्बंध लावलेले असतानाही कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक प्रचंड झपाट्याने वाढतेय. त्यामुळे नागरिकांनी मास्क लावणे, वारंवार हात धुवणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे अत्यंत आवश्यक आहे. महाराष्ट्रात गुरुवारी दिवसभरात 67,013 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर 568 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच 62,298 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. यासह महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 40,94,840 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 62,479 इतका झाला आहे. त्याचबरोबर राज्यात आतापर्यंत 33,30,747 जण कोरोनामुक्त झाले आहेत, तर सध्या 6,99,858 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत काल दिवसभरात 7,410 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 75 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच 8,090 जणांनी कोरोनावर मात केली. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 6,09,000 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 12,576 इतका झाला आहे, तर आतापर्यंत 5,11,143 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून सध्या 83,953 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

तसेच पुणे जिल्ह्यात गुरुवारी तब्बल 9,841 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 7,63,194 वर पोहोचली असून काल दिवसभरात 115 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा 11,882 इतका झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यात आढळलेल्या नव्या रुग्णांमध्ये 4,539 पुणे शहरातील, 2,539 पिंपरी-चिंचवडमधील आणि उरलेल्या ग्रामीण भागातील व कंटेनमेंट झोनमधील रुग्णांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button