पिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी कोरोनाचे 722 नवीन रुग्ण

पिंपरी l प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरात आज (रविवारी, दि. 6) दिवसभरात 722 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 2138 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात कोरोनाबाधितांची आजवरची संख्या 3 लाख 54 हजार 570 एवढी झाली आहे. तर आजवर 3 लाख 43 हजार 103 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील 4 हजार 589 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहरात 7 हजार 609 रुग्ण सक्रिय आहेत. त्यातील 7 हजार 333 जणांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 276 जणांवर शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

पिंपरी चिंचवड शहरात रविवारी पालिकेच्या 69 आणि खासगी 147 लसीकरण केंद्रांवर 7 हजार 677 नागरिकांचे लसीकरण झाले. आजवर शहरातील 33 लाख 13 हजार 492 जणांनी लस घेतली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button