breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुंबईत 7,214, पुण्यात 10,393 नवे रुग्ण; राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 39,60,359 वर

मुंबई – राज्यात कडक निर्बंध लावलेले असतानाही कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक प्रचंड झपाट्याने वाढतेय. त्यामुळे नागरिकांनी मास्क लावणे, वारंवार हात धुवणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे अत्यंत आवश्यक आहे. महाराष्ट्रात मंगळवारी दिवसभरात 62,097 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर 519 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच 54,224 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. यासह महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 39,60,359 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 61,343 इतका झाला आहे. त्याचबरोबर आतापर्यंत 32,13,464 जण कोरोनामुक्त झाले आहेत, तर सध्या 6,83,856 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत काल दिवसभरात तब्बल 7,214 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर 35 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच 9,641 जणांनी कोरोनावर मात केली. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 5,93,906 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 12,439 इतका झाला आहे, तर आतापर्यंत मुंबईत 4,96,263 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून सध्या 83,934 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

तसेच पुणे जिल्ह्यात मंगळवारी तब्बल 10,393 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 7,42,451 वर पोहोचली आहे. तर काल दिवसभरात 112 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने पुण्यातील कोरोनाबळींचा आकडा 11,647 इतका झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यात आढळलेल्या नव्या रुग्णांमध्ये 5,138 पुणे शहरातील आणि 2,563 पिंपरी-चिंचवडमधील रुग्णांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button