breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

कोलकात्यातील इमारतीच्या भीषण आगीत ७ जणांचा मृत्यू

कोलकाता – पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामधील बडा बाजार भागात स्ट्रेंड रोडवर एका बहुमजली इमारतीला सोमवारी सायंकाळी भीषण आग लागली. इमारतीच्या १३व्या मजल्यावर लागलेल्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या आगीत आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आग्निशमन दलाचे अधिकारी सुजीत बोस यांनी दिली आहे. तसेच ही इमारत रिकामी करण्यात आली असून परिसरातील वाहतूकही बंद करण्यात आली आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रात्री उशिरा या घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि बचावकार्य वेगाने करण्याच्या सूचना दिल्या. तसेच मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून 10 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे, तर पीडित कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरीही दिली जाईल, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले. तसेच घटनेच्या तपासासाठी 4 रेल्वे उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी ६ वाजून १० मिनिटांच्या जवळपास ही आगीची घटना घडली. आगीचा भडका पाहून नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. यानंतर लगेचच अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. या इमारतीत रेल्वेचेही कार्यालय आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, या घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये अग्निशमन दलाचे चार जवान, रेल्वे पोलीस दलाचे दोन जवान आणि एका पोलीस अधिकाऱ्याचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button