पिंपरी / चिंचवडपुणे

दापोडीच्या सीएमई परिसरातून 60 चंदनाची झाडे चोरीला : एकास अटक

पिंपरी l प्रतिनिधी

दापोडी येथील मिलिटरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरातून पाच जणांनी सुमारे 60 चंदनाची झाडे आणि रोपे चोरून नेली. ही घटना 30 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीत घडली असून पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

अशोक उर्फ वाकड्या भारमासाब काळे (वय 55, रा. दापोडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह त्याच्या तीन ते चार साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी निशांत सह्देवन कॅरिव्हिटल (वय 36, रा. सीएमई, दापोडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अशोक आणि त्याच्या साथीदारांनी मिळून 30 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर 2021 या कालावधीत दापोडी येथील मिलिटरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरातून दीड लाख रुपये किमतीची सुमारे 50 ते 60 चंदनाची झाडे आणि रोपे चोरून नेली. 30 डिसेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता झाडे चोरताना अशोक याला पकडण्यात आले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button