breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

5जी आणि कोरोनाचा काहीही संबंध नाही, अफवा पसरवल्यास कठोर कारवाई होणार

चंदीगड – ‘5जी नेटवर्कमुळे कोरोना होतोय’अशा अफवा गेल्या काही दिवसांपासून पसरत आहेत. हरियाणात या अफवेला उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर हरियाणाचे मुख्य सचिव विजय वर्धन यांनी देशात अजून 5जीची टेस्टिंगच सुरू झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन जनतेला केले असून अशा प्रकारच्या अफवा पसरविल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराच त्यांनी दिला आहे. विजय वर्धन यांनी एक पत्रक काढून हा इशारा दिला आहे. त्यांनी राज्यातील सर्व डीसी आणि एसपींना हे पत्र पाठवलं आहे.

कोरोनाचा आणि 5जीचा काहीही संबंध नाही. त्यामुळे अशा अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश वर्धन यांनी पोलिसांना दिले आहेत. काही असामाजिक तत्त्वांकडून अफवा पसरवून 5जीच्या टॉवरला क्षती पोहोचवण्याचे काम होत आहे. त्यांच्यावर तातडीने कारवाई करा. तसेच टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चरला हानी पोहोचणार नाही, याची काळजी घ्या, असे आदेश त्यांनी दिले आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button