ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

फेसबुकवर फ्रेंड होऊन 55 हजारांची फसवणूक

पिंपरी चिंचवड | ओळखीचा मित्र असल्याचे भासवून फेसबुकवर फ्रेंड होऊन 55 हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 23 ते 29 डिसेंबर दरम्यान वडमुखवाडी, च-होली येथे हा प्रकार घडला.याप्रकरणी प्रशांत प्रभाकर पाटील (वय 41, रा. वडमुखवाडी, च-होली) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार निरंजन कुमार याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना त्यांचा मित्र अभिजित घाटगे असल्याचा बहाणा करून, फेसबुकवर मैत्री केली. त्यानंतर वेगवेगळी बॅंक लिंक वरून 55 हजार रुपये काढून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button