breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

दिवाळीपर्यंत कमी होणार पेट्रोल-डिझेलचे दर!

अमृतसर : पुढील महिन्यात दिवाळीपर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट होण्याची शक्यता असल्याचे संकेत केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिले आहेत. केंद्र सरकारच्या दररोज पेट्रोलचे दर निश्चित करण्याच्या निर्णयाचा विरोधी पक्ष सुरुवातीपासून विरोध करत आहेत. हा निर्णय घेतल्यापासून पेट्रोल-डिझेलचे भाव वाढत असल्याची विरोधी पक्षांची तक्रार आहे.
अमृतसरच्या दौऱ्यावर असणाऱ्या पेट्रोलियम मंत्री प्रधान यांनी दिवाळीपर्यंत इंधनाच्या दरात कपात होईल असे संकेत दिले आहेत. प्रधान यांना अलिकडेच कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा मिळाला आहे. त्यांना कौशल्य विकास आणि उद्योजकता खात्याचा अतिरिक्त कार्यभारही सोपवण्यात आला आहे. अमेरिकेत आलेल्या पुरामुळे तेलाच्या उत्पादनात १३ टक्क्यांनी घट झाली आहे, परिणामी रिफायनरी तेलाचे भाव वाढल्याची माहिती प्रधान यांनी दिली.
त्यांना तेल कंपन्यांच्या नफ्याविषयी विचारले तेव्हा ते म्हणाले, ‘ते सरकारद्वारे निश्चित केले जाते.’ पेट्रोलियम उत्पादनांवरही लवकरच जीएसटी लावण्यात येणार आहे. यामुळे ग्राहकांनाच जास्त नफा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button