breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

पोटनिवडणुकांत ५० ते ८० टक्के मतदान

नवी दिल्ली |

देशभरातील तीन लोकसभा तसेच २९ विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीत ५० ते ८० टक्के मतदान झाले. १३ राज्यांमध्ये या जागा आहेत. मतदान शांततेत पार पडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हरयाणातील एलेनाबाद विधानसभा मतदारसंघात ८० टक्के मतदान झाले. राष्ट्रीय लोकदलाचे अभय चौताला येथून प्रमुख उमेदवार आहेत.

दादरा नगर हवेली लोकसभा मतदारसंघात ७५.५१ टक्के मतदान झाले. येथे शिवसेनेकडून दिवंगत खासदार मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर निवडणूक लढवत आहेत. येथे भाजपने महेश गावित यांना उमेदवारी दिली आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघात दुपारी पाच वाजेपर्यंत ५० टक्के मतदान झाले होते. मध्य प्रदेशातील खांडवा लोकसभा मतदारसंघात ६३ टक्के मतदान झाले. २ नोव्हेंबरला सर्व ठिकाणी मतमोजणी होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button