breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

देशभरात ओमायक्रॉनचे ४९५ नवे रुग्ण; दिवसभरात ९०,९२८ करोनाबाधितांची नोंद

नवी दिल्ली |

देशभरात गुरुवारी ४९५ नव्या ओमायक्रॉन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण ओमायक्रॉन रुग्णांची संख्या २,६३० झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. दिवसभरात महाराष्ट्रात ७९७, दिल्ली ४६५, राजस्थान २३६, केरळ २३४, कर्नाटक २२६, गुजरात २०४ आणि तामीळनाडूमध्ये १२१ ओमायक्रॉन बाधितांची नोंद झाली. देशभरात गुरुवारी ९०,९२८ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली. गेल्या २०० दिवसांतील ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. गेल्या वर्षी १० जून रोजी ९१,७०२ रुग्णांची नोंद झाली होती. देशभरातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता तीन कोटी ५१ लाख ०९,२८६ झाली आहे. गुरुवारी ३२५ जणांचा करोनाने मृत्यू झाला असून एकूण मृत्यूंची संख्या चार लाख ८२,८७६ झाली आहे. सध्या दोन लाख ८५,४०१ रुग्ण उपचाराधीन असून एकूण बाधितांमध्ये हे प्रमाण ०.८१ टक्के आहे.

दिल्लीत १५,०९७ नवे रुग्ण६ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली दिल्लीत गुरुवारी १५,०९७ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. सहा करोना रुग्णांचा मृत्यू झाला असून रुग्णवाढीचा दर १५.३४ टक्के असल्याचे राज्य प्रशासनाने सांगितले. राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या १४ लाख ८९,४६३ झाली असून मृत्यूंची एकूण संख्या २५,१२७ झाली आहे. उपचाराधीन रुग्णांची  एकूण संख्या ३१,४९८ आहेत. गेल्या २४ तासांत एक लाख चाचण्या करण्यात आल्याची माहिती गुरुवारी आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.

दिल्लीत बुधवारी १०,६६५ करोनाबाधित आढळले असून गुरुवारी त्यात पाच हजाराने भर पडली. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी राजधानीत अधिक रुग्णवाढ झाल्याचे सांगितले. मात्र राजधानीतील करोना परिस्थिती सामान्य आहे दिल्लीमध्ये पुरेशा रुग्णशय्या असून सध्या टाळेबंदीची गरज नसल्याचे जैन यांनी सांगितले.

इटलीहून अमृतसरला आलेले १२५ विमान प्रवासी करोनाबाधित

नवी दिल्ली : इटलीहून अमृतसर विमानतळावर उतरलेल्या चार्टर विमानातील १२५ प्रवासी करोनाबाधित असल्याचे आढळले, अशी माहिती पंजाब सरकारमधील अधिकाऱ्यांनी दिली. इटलीमधील मिलान शहरातून हे विमान बुधवारी दुपारी १.३० वाजता अमृतसर विमानतळावर उतरले. या विमानात १७९ प्रवासी होते. त्यापैकी १६० प्रवाशांची करोना चाचणी केली असता त्यापैकी १२५ प्रवाशांना करोनाची लागण झाल्याचा चाचणी अहवाल आला. या १७९ प्रवाशांपैकी १९ लहान मुले असल्याने त्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.  युरोअ‍ॅटलांटिक एअरवेज या पोर्तुगीज कंपनीचे हे विमान आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने तयार केलेल्या जोखिमीच्या देशांच्या यादीत इटलीचाही समावेश आहे.

भारती पवार यांना करोना संसर्ग
नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती प्रवीण पवार यांना करोनाचा संसर्ग झाला आहे. आपल्या संपर्कात आलेल्या सर्वानी करोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. आजच माझा करोना अहवाल प्राप्त झाला. त्यानुसार मी करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. काही दिवस मी स्वत:ला गृहविलगीकरणात ठेवत आहे. गेल्या दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी आपली करोना चाचणी करून घ्यावी आणि प्रतिबंधासाठी करोना नियमावलीचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन भारती पवार यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button