breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

40 वर्षाची राजकीय तपश्चर्या पाण्यात, आमदारांनी शब्द पाळला नाही !

  • कै. अंकुशराव लांडगे यांच्या राजकीय वारसदाराचा विश्वासघात
  • रवी लांडगे कार्यकर्त्यांसह वेगळ्या विचाराच्या तयारीत ?

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड महापालिकेवर 2017 मध्ये भाजपचा झेंडा फडकला. त्यामुळे पक्षातील जुन्या-नव्यांना भरघोस पदे मिळाली. परंतु, गेल्या चाळीस वर्षांपासून खांद्यावर भाजपची पताका घेऊन पक्षाची पाळेमुळे खोलवर रुजविण्याचे काम करणारे कै. अंकुशराव लांडगे यांचे राजकीय वरसदार नगरसेवक रवी लांडगे यांना पाच वर्षात पक्षाने पालिकेतील एकही पद दिले नाही. सरत्या वर्षात स्थायी समिती सभापती पदावर संधी मिळण्याची आपेक्षा त्यांना होती. मात्र, स्थानिक पक्षश्रेष्ठींनी तिही जानिवपूर्वक डावलल्याने त्यांच्या पदरी राजकीय नैराश्य आले आहे. त्यामुळे त्यांनी 40 वर्षे आमच्या घराण्याने भाजपसाठी घेतलेले श्रम पाण्यात गेल्याची दुःखद भावना व्यक्त केली आहे.

कोणत्याही क्षेत्रात परिवर्तनात्मक व सकारात्मक वृत्ती उराशी बाळगून प्रयत्नांची पराकाष्टा करायची तयारी ठेवायला हवी. श्रमप्रतिष्ठा जपायला हवी; कारण श्रम हीच सुखाची गुरुकिल्ली आहे. कष्टाला आणि निष्ठेला नियतीची सकारात्मक साथ मिळणारच असते, हा दृढ विश्वास मनात घट्ट करून कै. अंकुशराव लांडगे यांनी भोसरीसह पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीमध्ये भाजपची मुहूर्तमेढ रोवली असावी. पक्षासाठी त्यांनी उपसलेले कष्ट आणि तदवेळीची निस्वार्थी भावना सत्ताकाळात फलदायी ठरेल, असा विश्वास त्यांनाही वाटला असावा, म्हणूनच तर त्यांनी पक्षासाठी जीवाचे रान केले. पुढे त्यांची राजकीय परंपरा कायम ठेवण्याचे काम रवी लांडगे यांनी केले. राष्ट्रवादीकडून मोठी ऑफर असताना ती डावलून त्यांनी इमानेइतबारे भाजपचे काम केले. पालिकेत अवघे तीन नगरसेवक असताना रवी लांडगे यांनी पक्षाला धोका दिला नाही. परंतु, आज सत्ताकाळात त्यांना एकही पद न मिळाल्यामुळे त्यांनी पक्षावर आणि स्थानिक पक्षप्रमुखांवर तिव्र नाराजी व्यक्त केली आहे.

————————-

ऐनवेळी डावलल्याने नाराजी

रवी लांडगे म्हणाले की, स्थायी समिती सभापती पदाचा एक वर्षाचा कार्यकाळ नुकताच संपत आहे. सभापती पदावर मला संधी देण्याचा शब्द आमच्या आमदारांनी दिला होता. त्यामुळे मी मागील वर्षी माघार घेतली होती. यावर्षी तरी संधी मिळेल, या आपेक्षेने गेल्या पंधरा दिवसांपासून पक्षातील वरिष्ट व श्रेष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यांना एकवेळ संधी देण्याची विनंती केली. यावेळी तुलाच संधी देणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. मात्र, आज उमेदवारी अर्ज भरायची वेळ आल्यानंतर ऐनवेळी मला डावलण्यात आले. त्यामुळे माझी नाराजी आहे. येत्या काळात कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा त्यांनी पक्षाला दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button