TOP Newsआरोग्यताज्या घडामोडीपुणे

15 ते 18 वयोगटासाठी शहरात 40 लसीकरण केंद्रे

3 जानेवारीपासून होणार लसीकरण सुरू

पुणे | केंद्र सरकारच्या निर्देशानुसार पुणे मनपाहद्दीतील 15 ते 18 वयोगटातील नागरिकांसाठी कोरोना लसीकरणाचे नियोजन केले आहे. आता पाचऐवजी 40 केंद्रांवर 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी लसीकरण केंद्रे तयार करण्यात आली आहेत. त्यासाठी 1 जानेवारीपासून कोविन पोर्टलवर नोंदणी सुरू होत आहे.पात्र लाभार्थ्यांची संख्या, एकाच वेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी आणि ओमायक्रॉन विषाणूच्या संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षता घेता 15 ते 18 वयोगटासाठी सुरू होणाऱ्या कोरोना लसीकरणाच्या केंद्रांची संख्या 5 वरून 40 पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. लसीकरण वेळेत, वेगाने आणि सुकर करण्याचा आपला प्रयत्न आहे, त्याला निश्चितच यश येईल, हा विश्वास वाटतो, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

महापालिकेने 3 जानेवारीपासून लसीकरण सुरू करताना पाच केंद्र निश्‍चित केली होती. मात्र, शहरातील लाभार्थ्यांची संख्या असल्याने हे केंद्र अपुरे पडणार आहेत.

तसेच 50 टक्के लस ही आॅनलाइन तर 50 टक्के थेट केंद्रावर जाणाऱ्यांसाठी उपलब्ध असल्याने लसीकरणासाठी या पाच केंद्रांवर मोठी गर्दी होऊन गोंधळ झाला असता. त्यामुळे आता केंद्र संख्येत वाढ करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button