आरोग्यताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
शहरात 32 नवीन रुग्णांची नोंद; 43 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज
पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 32 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 43 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.महापालिका हद्दीबाहेरील 1 रुग्णाचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 506 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 77 हजार 125 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 387 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 180 रुग्ण गृहविलगीकरणात असून 207 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 18 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 249 आहेत. आज दिवसभरात 7 हजार 129 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 24 लाख 86 हजार 688 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.