पिंपरी / चिंचवड

व्यवसायासाठी घेतलेले पैसे परत न करता वृद्ध नागरिकाची 31 लाख 75 हजारांची फसवणूक

पिंपरी l प्रतिनिधी

व्यवसायासाठी पैशांची गरज असल्याचे सांगून ज्येष्ठ नागरिकाकडून 31 लाख 75 हजार रुपये घेतले. मात्र ते पैसे परत न करता ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक केली. याप्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 12 फेब्रुवारी 2019 ते 16 मार्च 2022 या कालावधीत श्रीधरनगर, चिंचवड येथे घडली.

सुब्रय रामा हेगडे (वय 65, रा. पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चंद्रशील टेकचंद खोब्रागडे, टेकचंद कांथुजी खोब्रागडे, प्रतिभा टेकचंद खोब्रागडे, जयदीप शशिकांत कुत्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींना व्यवसायासाठी पैशांची गरज आहे असे सांगून बँकेपेक्षा एक टक्का ज्यादा व्याजदर देऊन मे 2019 पर्यंत सर्व पैसे परत करतो असे सांगण्यात आले. रकमेची आवश्यकता असल्याने तुम्ही पैसे दिले तर चांगले होईल आणि आरोपींचा व्यवसाय चालू राहील, असे फिर्यादी यांना सांगण्यात आले. फिर्यादी यांच्या कडून घेतलेले 31 लाख 75 हजार रुपये आरोपींनी मुदतीत्पारात न करता त्यांना धमकी देऊन त्यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button