breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

31 जूलैला ठरणार पिंपरी चिंचवडचे महापाैर, उपमहापाैर ; निवडणूक कार्यक्रम जाहीर

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणूक कार्यक्रम विभागीय आयुक्तांनी जाहिर केला आहे. शनिवार दि. ४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. याबाबतचे आदेश विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी नगरसचिव विभागाला दिले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चिंचवड दाै-यानंतर महापाैर व उपमहापाैर निवड प्रक्रियेला वेग आला.  मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर सव्वा वर्षे कालावधी झालेल्या पिंपरीचे महापौर नितीन काळजे आणि उपमहापौर शैलजा मोरे यांना राजीनामे द्यावे लागले आहेत.  पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापाैर पद हे इतर मागास प्रवर्ग ( आेबीसी) राखीव आहे. महापालिकेत पहिल्यांदा भाजपची सत्ता आल्यानंतर हे महापौर पदाची लॉटरी नितीन काळजे यांना मिळून महापालिकेतील सामाविष्ट गावाला न्याय मिळाला आहे. 

सध्या महापाैर पदाची लाॅटरी कोणाला लागणार याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे महापौर पद भोसरीत जाणार की, चिंचवड विधानसभेच्या वाट्याला येणार यावर तर्कवितर्क लढविले जात आहेत. महापाैर पदासाठी शत्रुघ्न काटे, नामदेव ढाके, राहूल जाधव यांचे नाव आघाडीवर आहे. तर उपमहापाैर पद हे पिंपरी गावाकडे जाण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, पुणे विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार ४ ऑगस्ट रोजी महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक घेण्यात येणार आहे. पीएमपीएमपीएलच्या अध्यक्षा नयना गुंडे पीठासन अधिकारी म्हणून या निवडणूकीचे कामकाज पाहणार आहेत. तत्पुर्वी मंगळवार दि.३१ जुलै रोजी या दोन्ही पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. त्याचवेळी महापौर आणि उपमहापौर कोण होणार हे देखील स्पष्ट होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button