पिंपरी / चिंचवड
अशोकनगर येथे गोडाऊनला लागलेल्या आगीत 30 लाखांचे नुकसान
पिंपरी l प्रतिनिधी
पिंपरी मधील अशोकनगर येथे एका गोडाऊनला 18 एप्रिल रोजी आग लागली. या आगीत गोडाऊनमधील 30 लाख रुपयांच्या मालाचे नुकसान झाले. याप्रकरणी अज्ञाताच्या विरोधात 23 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी लक्ष्मण पोपट भालेराव (वय 36, रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे अशोकनगर पिंपरी येथे पत्र्याचे गोडाऊन आहे. 18 एप्रिल रोजी रात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास अज्ञाताने फिर्यादी यांच्या गोडाऊनला आग लावली. गोडाऊन मध्ये फोटो फ्रेमचे बॉक्स, एम डी एफ (की बोर्ड) व फोटो फ्रेम तयार करण्याचे कॉम्प्रेसर मशिनरी असे एकूण 30 लाखांचे साहित्य जळून नुकसान झाले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.