TOP NewsUncategorizedआंतरराष्टीय

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत तिरंगा अभियानाच्या माध्यमातून नवभारताचा पाया मजबूत करणार- पंतप्रधान नरेंद्र मोदी

सुरत । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा देशातील प्रत्येक नागरिकासाठी अभिमानाचा विषय आहे,असे शहा यांनी यावेळी सांगितले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याचा अमृतोत्सव नव्या पद्धतीने साजरा करण्याचा संकल्प केला आहे असे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत तिरंगा अभियानाच्या माध्यमातून नवभारताचा पाया मजबूत करणार असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरत येथे केले. सूरत तिरंगा यात्रेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे देशवासियांना संबोधित करताना हा संदेश दिला.

‘हर घर तिरंगा’ ही मोहीम देशातील प्रत्येक नागरिकाच्या हृदयात देशभक्तीची भावना अधिकाधिक वृद्धिंगत करणारा कार्यक्रम असल्याचे शहा यांनी सांगितले. देशातील 20 कोटींहून अधिक घरे आणि शंभर कोटींहून अधिक लोक तीन दिवस आपापल्या घरावर तिरंगा फडकवतील आणि तिरंग्याच्या माध्यमातून पुन्हा भारतमातेच्या सेवेसाठी स्वतःला समर्पित करतील. लोकसहभागातून 13 ते 15 ऑगस्ट 2022 दरम्यान सर्व घरांवर राष्ट्रध्वज फडकवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांनी सांगितले. या प्रयत्नात देशातील सरकारी आणि खाजगी आस्थापनांचाही सहभाग असेल. तिरंगा फडकवल्याने देशाप्रती देशप्रेमाची भावना अधिक दृढ होईल आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी अगणित हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानाची जाणीव देशातील बालके आणि तरुणांना होईल, असे त्यांनी सांगितले. 20 कोटी तिरंगे घरांवर फडकवणे हे एक भगीरथ कार्य आहे आणि हा कार्यक्रम देशात देशभक्तीची नवीन भावना जागृत करण्यात मोठे योगदान देईल.

यावर्षी 22 जुलैपासून आपण सर्वांनी आपल्या होमपेजवर, प्रत्येक राज्याच्या प्रत्येक संकेतस्थळावर आणि देशातील प्रत्येक व्यक्तीने त्यांच्या फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर आणि इतर समाजमाध्यमांवरील खात्याच्या होमपेजवर तिरंगा लावला तर याची प्रसिद्धी आपोआप होईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. राज्य सरकारांच्या सर्व जाहिरातींमध्ये ‘हर घर तिरंगा’चा प्रचार करण्यात यावा, राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी दूरचित्रवाणी वाहिन्या आणि स्थानिक वाहिन्यांना विनंती केल्यास त्या वाहिन्यादेखील छोटे- छोटे कार्यक्रम करून हे अभियान पुढे नेतील. गावातील सहकारी संस्था आणि सार्वजनिक उपक्रमांच्या माध्यमातूनही याचा प्रचार करायला हवा. प्रत्येक व्यक्ती या उपक्रमाशी जोडली जाईल, यादृष्टीने प्रसिद्धीची सर्व माध्यमे वापरली पाहिजेत. असे पंतप्रधान यांनी सांगितले.

देशातील टपाल कार्यालयांमध्ये तिन्ही प्रकारचे ध्वज उपलब्ध असावेत, अशी व्यवस्था भारत सरकारने केली आहे. टपाल कार्यालयामधूनही तुम्ही तुमची मागणी नोंदवू शकता, तिथे जाऊन प्रत्येक नागरिक ध्वज खरेदी करू शकतो आणि ऑनलाइन खरेदीचीही व्यवस्था आहे. राज्य सरकारांसाठी जीईएमवर हे ध्वज उपलब्ध आहेत. 13 तारखेला जेव्हा हे अभियान सुरू होईल, तेव्हा आपल्या घरावर झेंडा फडकवून जर आपण भारत सरकारच्या  (https://harghartiranga.com/) या समर्पित संकेतस्थळावर आपली सेल्फी टाकली तर 13 तारखेपासूनच या अभियानाला गती मिळेल.आणि 15 तारखेपर्यंत कोट्यवधी घरांवर तिरंगा फडकलेला पाहण्याचे भाग्य आपल्या सर्वांना मिळेल,असे आवाहन मोदी यांनी तमाम देशवासियांना केले. देशाच्या तरुण पिढीत देशभक्तीची भावना ओतप्रोत रुजवणे आणि देशातील लहान मुले, किशोरवयीन आणि तरुणांना येत्या दीर्घ काळासाठी देशाच्या विकास, सुरक्षा आणि भविष्याशी जोडण्याचे संस्कार देणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीत गुजरात, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, झारखंड, कर्नाटक, पंजाब, दिल्ली, नागालँड, आसाम आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ‘हर घर तिरंगा’ कार्यक्रमाबाबत आपले विचार आणि सूचना मांडल्या.या अभियानात आपापल्या राज्यातील सर्व घरे आणि आस्थापना पूर्णपणे सहभागी होतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button