breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

राज्यात २६ हजार नवे बाधित, ५ हजार रुग्णांना डिस्चार्ज

मुंबई | प्रतिनिधी 
मुंबईत १५ हजार रुग्ण सापडलेले असताना राज्यात तब्बल २६ हजार ५३८ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. तर १४४ ओमायक्रोनचे रुग्ण सापडले आहेत. गेल्या काही दिवसात राज्यात झपाट्याने रुग्ण वाढ होत असल्याने निर्बंध अधिक कडक करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

राज्यात ओमायक्रोनच्या १४४ रुग्णांची वाढ झाली असून यात एकट्या मुंबईत १०० रुग्ण आढळले आहेत. तर नागपूरमध्ये ११ तर पुण्यात ७ रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे राज्यात ओमायक्रोनचे एकूण ७९७ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 330 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्यात आज तब्बल 26 हजार 538 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 5331 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाची संख्या ही हजाराच्या पुढेच येत आहे. आज रुगणसंख्येने 25 हजाराचा आकडा देखील ओलंडला आहे. तसेच ओमायक्रॉन व्हेरियंटनेही चिंता वाढवली आहे. देशातील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत.

4 जानेवारी – 18 हजार 466 रूग्ण
3 जानेवारी – 12, 160 रूग्ण
2 जानेवारी – 11, 877 रूग्ण
1 जानेवारी – 9,170 रूग्ण
31 डिसेंबर – 8067 रूग्ण

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button