breaking-newsEnglishTOP Newsआंतरराष्टीयटेक -तंत्रताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशमुंबईराजकारणराष्ट्रिय

आयपीएस अधिकाऱ्याचा गौप्यस्फोट…म्हणून मुंबई 26/11 हल्ला घडवून आणला होता…

महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

मुंबईवर 26 नोव्‍हेंबर 2008 ला दहशतवाद्यांनी भयंकर हल्‍ला केला होता. या घटनेत 166 जणांचा मृत्‍यू झाला होता. अजमल कसाब या दहशतवाद्याला जिवंत पकडण्‍यात आले होते. मुंबईवर झालेल्या याच हल्ल्याबाबत आता एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. मुंबईवर 26 नोव्‍हेंबर 2008 ला दहशतवाद्यांनी भयंकर हल्‍ला केला होता. या घटनेत 166 जणांचा मृत्‍यू झाला होता. अजमल कसाब या दहशतवाद्याला जिवंत पकडण्‍यात आले होते. मुंबईवर झालेल्या याच हल्ल्याबाबत आता एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. एका वेगळ्या कारणाने मुंबईवरील दहशतवादी हल्ला घडवून आणला होता, असा गौप्यस्फोट अतिरिक्त सचिव व जम्मू-काश्मीरचे आयपीएस अधिकारी शिवमुरारी सहाय यांनी केला.

‘ब्रह्मा रिसर्च फाऊंडेशन’ या सुरक्षाविषयक विचारमंचातर्फे २६ नोव्हेंबरच्या मुंबई हल्ल्याच्या निमित्ताने राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत शिवमुरारी सहाय यांच्यासह विविध सुरक्षातज्ज्ञांनी आपले विवेचन सादर केले. या परिषदेत भाष्य करताना सहाय यांनी मुंबईवरील हल्ल्याबाबात गौप्यस्फोट केला. यावेळी ते म्हणाले की, “लष्कर-ए-तोयबा’कडून भारतविरोधी कारवायांबरोबरच अफगाणिस्तानही अतिरेकी कारवाया करण्यात येतात. पण त्यापैकी कोणता जिहाद मोठा, यावरून या अतिरेकी संघटनेत अंतर्गत संघर्ष सुरू झाला होता. हा वाद मिटवून त्यांना एकत्र आणण्यासाठी भारतात काहीतरी मोठी कारवाई घडविणे ‘आयएसआय’ला गरजेचे होते. मुंबईवरील दहशतवादी हल्ला त्यासाठीच घडवून आणला गेला,” असे त्यांनी सांगितले.

“मुंबई हल्ल्याचा कट शिजविताना डेव्हिड हेडलीने अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. त्याला तहव्वूर राणा याचीही साथ मिळाली होती. हेडलीने एकूण २६९ दिवस मुक्काम केला व भारतात नऊ दौरे केले. त्यामध्ये बंगळुरू, हैदराबाद, कोलकाता, दिल्ली, मुंबई या शहरांना भेटी दिल्या. हल्ल्यादरम्यान दहशतवाद्यांनी दिवसा मुंबईत प्रवेश केला असता तर हल्ल्याची लक्ष्ये वेगळी असती. इतके काटेकोर नियोजन होते. हा संपूर्ण कट अमलीपदार्थांच्या तस्करीतील व्यवहारांवर बेतलेला होता. इटली हे या नियोजनातील महत्त्वाचे केंद्र होते”, असेही सहाय यांनी सांगितले.

या परिषदेचे उद्घाटन भारतीय संरक्षण मंत्रालयास प्रधान सल्लागार असलेले व लष्करात ४३ वर्षे सेवा देऊन निवृत्त झालेले लेफ्टनंट जनरल विनोद खंडारे यांनी केले. ब्रह्मा रिसर्च फाऊंडेशनचे संस्थापक प्रा. विजय पागे यांनी या चर्चासत्रांचे प्रास्तविक केले. भारतीय नौदलातील निवृत्त व्हाइसअडमिरल अभय कर्वे, भारतीय तटरक्षक दलाचे निवृत्त अतिरिक्त महासंचालक विजय चाफेकर, इस्रायल नौदलाचे निवृत्त व्हाइसअडमिरल डेव्हिड बेन-बाशात यांच्यासह विविध मान्यवर चर्चासत्रात सहभागी झाले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button