ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

25 राज्यांनी पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करून ग्राहकांना दिलाय दिलासा, महाराष्ट्रात देखील मिळणार दिलासा ?

पिंपरी चिंचवड | पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेऊन केंद्राचा व्हॅट कमी केला. त्यानंतर केंद्र सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनाही विनंती केली होती. 25 राज्यांनी व्हॅट कमी करून ग्राहकांना दिलासा दिला. मात्र, महाराष्ट्रासह नऊ राज्यांनी ग्राहकांना दिलासा दिलेला नाही. विशेष म्हणजे यामध्ये सर्व भाजपविरोधी पक्षांची सरकारे असलेली राज्ये आहेत.दिवाळीच्या पूर्वसंध्येला इंधनावरील केंद्रीय उत्पादन शुल्कात लक्षणीय घट करण्याची घोषणा मोदी सरकारने केली होती. त्यानंतर राज्यांनीही मूल्यवर्धित कर (व्हॅट) कमी करावा अशाी विनंती केली. त्याला 25 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र, पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्याची घोषणा करणाºया बहुतांश राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष (भाजप) किंवा त्यांच्या मित्रपक्षांची सत्ता आहे.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र, दिल्लीचे एनसीटी, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ, झारखंड, छत्तीसगड आणि राजस्थान या राज्यांनी व्हॅट कमी केलेला नाही. याठिकाणी भाजपविरोधी सरकारे आहेत. यामध्ये केवळ कॉँग्रेसचे सरकार असलेल्या पंजाबचा अपवाद आहे. मात्र, पंजाबमध्ये येत्या काही महिन्यांत निवडणुका होणार असल्याने निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्र आणि राज्य सरकारने अनुक्रमे केंद्रीय उत्पादन शुल्क आणि व्हॅटमध्ये कपात जाहीर केल्यानंतर पंजाबमध्ये पेट्रोलच्या दरात सर्वाधिक कपात झाली आहे. पंजाबमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 16.02 रुपये , लडाखमध्ये प्रति लिटर 13.43 रुपये आणि कर्नाटकमध्ये प्रतिलिटर 13.35 रुपये कमी झाल आहेत.

अंदमान आणि निकोबारच्या ग्राहकांना देशातील सर्वात स्वस्त म्हणजे 82.96 रुपये प्रति लीटर पेट्रोल मिळत आह. इटानगरमध्ये 92.02 रुपये प्रति लीटर पेट्रोल विकले जात आहे. याउलट जयपूरमध्ये पेट्रोलची किंमत प्रति लीटर 117.45 रुपये तर मुंबईतील ग्राहकांना 115.85 रुपये प्रति लिटर पेट्रोल ग्राहकांना विकत घ्यावे लागत आहे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button