TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

नवी मुंबईमध्ये गोवरचे २४ रुग्ण

नवी मुंबई: नवी मुंबई मध्ये आतापर्यंत गोवरचे २४ रुग्ण आढळउन आले आहेत. शहरामध्ये लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरु असून, शहराला गोवरचा धोका नसल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात ३ रुग्ण आढळून आले असून, १५ संशयित आढळून आले आहेत. मुंबईसह ठाण्यात तसेच इतर शहरांमधील गोवरबाधीत मुलांची संख्या वाढत असून नवी मुंबई शहरात हे प्रमाण कमी असून आतापर्यंत शहरात २४ रुग्ण आढळले आहेत. तरीदेखील नवी मुंबईत गोवरस संसर्ग टाळण्यासाठी आरोग्य विभागामार्फत नागरी आरोग्य केंद्रनिहाय विशेष सर्व्हेक्षणाला सुरूवात करण्यात आलेली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे घेण्यात आलेल्या लसीकरण सत्रात गोवर संबंधित बालकांचे आत्तापर्यंत १०६% लसीकरण झाले असल्याने नवी मुंबई शहराला याचा धोका उद्भवत नाही, अशी माहिती महापालिका आरोग्य विभाग अधिकारी यांनी दिली आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात गोवर या संसर्गजन्य आजाराचे तीन बालके आढळली आहेत. या तिघांचे वयोगट २ ते ५ वर्षे आहे. हे बाधित बालके नवीन पनवेल येथील टेंभोडे गावात, तक्का आणि पनवेल शहरातील रोहीदास वाडा येथे ही बालके आहेत. नऊ महिने पुर्ण झालेल्या बालकांना पनवेल पालिकेचे आरोग्य विभागाकडून गोवर प्रतिबंधक लसीकरण सूरु आहे. तर दूसरी लस १६ ते २४ महिने झालेल्या बालकांना देण्यात येत असल्याची माहिती पालिकेच्या प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. रेहना मुजावर यांनी दिली. पालिकेच्या सहा आरोग्य केंद्रावर आठवड्यातील दर बुधवारी मोफत ही लस दिली जात असल्याकडे डॉ. मुजावर यांनी सांगितले. आशावर्करच्या माध्यमातून घरोघरी जाऊन लसीकरण व सर्वेक्षणाचे काम पालिका क्षेत्रात सूरु आहे. ताप व अंगावरील पुरळ आलेल्या १५ बालकांचे रक्त तपासणीसाठी नमुने पालिकेच्या आरोग्य विभागाने घेतले असून या बालकांना संशयित गोवर रुग्ण म्हणून पालिकेने घोषित केले आहे. गोवर टाळण्यासाठी बालकांना व्हिटॅमीन ए चा डोस देणे अत्यंत गरजेचे असल्याचे पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button