breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

बर्फवृष्टीत गाड्यांमध्ये अडकून २३ जणांचा मृत्यू, पाकिस्तानी मंत्र्याचं धक्कादायक वक्तव्य; म्हणला, “एवढा पैसा खर्च..”

नवी दिल्ली |

पाकिस्तानमधील लोकप्रिय पर्यटनस्थळ असणारं मरी हे छोटसं शहर सध्या एका धक्कादायक घटनेसाठी फार चर्चेत आहे. या ठिकाणी अचानक झालेल्या जोरदार बर्फवृष्टीमुळे २३ पर्यटकांचा गाड्यांमध्ये अडकून मृत्यू झालाय. या पर्यटकांना पुरेसा ऑक्सिजन, जेवण आणि पाणी न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. इम्रान खान यांच्या सरकारने या पर्यटकांना वाचवण्यासाठी केलेले प्रयत्न अपुरे ठरल्याचा दावा प्रसारमाध्यमे आणि विरोधी पक्षांकडून केला जातोय. असं असतानाच आता इम्रान खान यांच्या सरकारमधील एका नेत्याने या घटनेवर फारच धक्कादायक वक्तव्य केलंय. पाकिस्तानचे सूचना मंत्री फवाद चौधरी (pakistan murree deaths fawad chaudhry) यांनी या घटनेबद्दल बोलताना, “ज्यांना बर्फवृष्टीचा आनंद घ्यायचा आहे त्यांनी बर्फावाला स्प्रे विकत घेतला पाहिजे. हा स्प्रे घरात एकमेकांवर उडवावा, मात्र बाहेर फिरायला जाऊ नये,” असं म्हटलंय. “तिथे फार मोठ्याप्रमाणात पर्यटक आले होते. त्यामुळे प्रशासनाला काहीच करता आलं नाही. एवढा पैसा खर्च करण्याऐवजी घरी बसावं, बर्फाच्या स्प्रेची ऑर्डर करावी आणि एकमेकांवर तो उडवावा. लोकांनी आपला कॉमन सेन्स वापरला पाहिजे,” असं धक्कादायक वक्तव्य करत चौधरी यांनी प्रशासनाची पाठराखण केली.

या असंवेदनशील वक्तव्यासाठी सध्या चौधरी यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होण्याबरोबरच फार जास्त संख्येने या ठिकाणी पर्यटक गेल्याने प्रशासनाला काहीच करता आलं नाही असा दावा चौधरी यांनी केलाय. ज्या २३ पर्यटकांचा मृत्यू झालाय त्यामध्ये एका चार वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. या मुलीचा मृत्यू थंडी आणि निमोनियामुळे झालीय. अडकलेल्या गाडीमधून तिला बाहेर काढून रुग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी नेलं जात असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. मरी हे पाकिस्तानमधील पंजाब प्रांतामधील रावळपिंडी शहराजवळचं छोटंसं पर्यटनस्थळ आहे. हे पाकिस्तानमधील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक आहे. या ठिकाणी दरवर्षी हजारोच्या संख्येने पर्यटक येतात. मात्र जोरदार बर्फवृष्टी झाल्याने यावेळेस येथे मोठी वाहतूककोंडी झाली. बर्फवृष्टी एवढ्या मोठ्या प्रमाणात झाली की अनेक गाड्या आणि त्यामधील लोक आहे तिथेच अडकून राहिले. वेळेत मदत न मिळाल्याने २३ जणांचा मृत्यू झाला ज्यात १० मुलांचाही समावेश आहे. पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद यांनी लोकांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलाय. मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाल्याने ही घटना घडल्याने याला नैसर्गिक आपत्ती मानलं जाईल असं गृहमंत्री म्हणालेत. या ठिकाणी बर्फवृष्टी झाल्याने गाड्या अडकून पडल्या. काहींनी चालत प्रवास करण्यास सुरुवात केली. मात्र बर्फ एवढा होता की चालत चालतही त्यांना सुरक्षित जागी पोहचता आलं नाही. श्वास अडकल्याने अनेकजण मृत्यूमुखी पडल्याचा दावा गृहमंत्र्यांनी केलाय.

 

 

 

 

 

 

 

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button