नवी दिल्ली: अनिसिया बात्रा नावाच्या एका 40 वर्षीय एअरहोस्टेसने आज दिल्लीत राहत्या घरी उंच इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. ती एका जर्मन विमान कंपनीत एअरहोस्टेस म्हणून काम करीत होती. मरण्यापुर्वी तिने आपल्या पतीला आपण जीव देत असल्याची माहिती एसएमएस वरून दिली होती. नवऱ्यानेच तिला रूग्णालयात दाखल केले पण तेथे दाखल करण्यापुर्वीच तिचा मृत्यू झाला. तिचा सासरच्या लोकांकडून हुंड्यासाठी छळ होत होता अशी तक्रार तिच्या माहेरच्या लोकांनी केली आहे. तिचा पती दारूडा आहे. तो तिच्याकडे सतत पैशाची मागणी करीत असे. तसेच तो तिचा शारीरीक आणि मानसिक छळही करीत असे असेही सांगण्यात येत आहे.
हे कुटुंब दिल्लीच्या हौज खास भागात राहाते. सदर मुलीचे वडिल लष्करातील निवृत्त मेजर जनरल पदावरचे अधिकारी आहेत. तिचा नवरा गुडगावच्या एका आयटी कंपनीत कामाला आहे. पोलिसांनी तिच्या नवऱ्या विरोधात गुन्हा दाखल केला असून अजून त्याला अटक करण्यात आलेली नाही.
Like this:
Like Loading...