माए साई : थायलंडमधील एका मोठ्या गुहेत अडकलेल्या लहान मुलांच्या फुटबॉल टीम आणि त्यांच्या प्रशिक्षकाला बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. ज्या डोंगरात ती गुहा आहे, त्याचा कडा ड्रील मशिनने तब्बल १०० ठिकाणी खोदकाम सुरू करण्यात आले आहे. या प्रयत्नांतून या मुलांपर्यंत पोहोचणे शक्य होईल, अशी आशा या नौदल अधिकाऱ्यांना वाटत आहे.

नौदलाने डोंगर कडेच्या भागात खोदकाम सुरू केले असून, एका विशिष्ट ठिकाणी तब्बल ४00 मीटर खोदकाम केले. तरीही ती मुले नेमकी कुठे आहेत, हे अजून समजू शकलेले नाही. आणखी २00 मीटर खोलवर खोदावे लागेल, असा अंदाज आहे. आतमध्ये अडकलेल्या सर्वांना ऑक्सिजन पुरवठा होण्यासाठी पाइपलाइन टाकण्यात आली आहे, असे थायलंड नौदलाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.