राजकुमार राव आणि कंगना राणावत यांची प्रमुख भूमिका असलेला ‘मेंटल है क्या?’ हा चित्रपट पुढील वर्षी फेब्रुवारी २२ला प्रदर्शित होणार आहे. कंगना आणि राजकुमारची ‘क्वीन’ या नावाजलेल्या चित्रपटातील जोडी यानिमित्ताने पुन्हा एकदा सिनेस्क्रीनवर पाहण्यास मिळणार आहे.
‘मेंटल है क्या?’ आपल्या सर्वांमधील वेडेपणाची कथा असणार असल्याचे चित्रपटाच्या प्रोड्युसर एकता कपूर यांनी सांगितलं. राजकुमार राव आणि कंगना राणावत हे दोघेही सध्या कारकीर्दीच्या सर्वोत्तम टप्प्यावर असून राजकुमारच्या नुकत्याच आलेल्या ‘न्यूटन’ला मोठे यश मिळाले होते.
Like this:
Like Loading...