breaking-newsताज्या घडामोडीव्यापार

2021 अखेर सोन्याचा भाव दुप्पटीने वाढण्याची शक्यता

कोरोनाने अर्थव्यवस्थेला ठप्प करून टाकलं आहे…त्यामुळे आता विकासदर तळ गाठणार आहे. या मंदीसदृश परिस्थितीत मौल्यवान धातू वगळता सर्वच गुंतवणूक या फेल गेल्या असून गुंतवणूकादारांचे मोठे नुकसान झाले आहे. दिवसागणीक बिकट होणाऱ्या या परिस्थितीत सोनं तग धरून आहे. सोन्याच्या दरातील तेजी हे त्यातील विश्वासार्हता अधोरेखीत करणारी आहे. सोने दरवाढ अशीच कायम राहिली तर २०२१ अखेर सोन्याचा भाव प्रती दहा ग्रॅमला ८२००० रुपयांपर्यंत वाढेल, असा अंदाज नामांकित संस्थांनी व्यक्त केला आहे.

बँक आॅफ अमेरिका सिक्युरिटीज या संस्थेच्या अहवालानुसार २०२१ अखेर सोन्याचा भाव जागतिक बाजारात ३००० डाॅलर प्रती औंस इतका वाढेल. चलन विनिमय दरानुसार सोने भारतात प्रती दहा ग्रॅमला ८२००० रुपये इतक महागेल. सध्या मल्टी कमाॅडिटी एक्सचेंजमध्ये (MCX) सोने ४६३५२ रुपये आहे. आतापासून पुढील दीड वर्षात सोने ८२००० रुपयांवर जाईल. त्यात ७५ टक्के वाढ होईल असा अंदाज या संस्थेने व्यक्त केला आहे. जागतिक कमाॅडिटी बाजारात सोने दर प्रती औंस १७५० डाॅलरच्या आसपास आहे.

गोल्डमन सॅक्स या आणखी एका संस्थेने सोन्याच्या भविष्यातील वाटचालीबाबत अंदाज व्यक्त केला आहे. सध्याची जागतिक परिस्थितीत सोने हेच इतर कमाॅडिटीच्या तुलनेत उजवे ठरत आहे. कच्च्या तेलात गुंतवणूक करण्याऐवजी सोनं गुंतवणूकदारांना सोयीस्कर आणि सुरक्षित गुंतवणूक पर्याय ठरत आहे, असे गोल्डमन सॅक्सच्या विश्लेषकांचे म्हणंण आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button