breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबई शहरात २४ तासांत शहरात २० हजार ९७१ रुग्णांची नोंद

मुंबई | प्रतिनिधी 
मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढीचा वेग हा काहीकेल्या कमी होण्याचं नावच घेत नाहीये. गेल्या २४ तासांमध्ये शहरात २० हजार ९७१ कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रात रुग्णसंख्या सातत्याने वाढत असल्यामुळे प्रशासनासमोरची चिंता ही सातत्याने वाढत चालली आहे. त्यातच गेल्या २४ तासांत ६ जणांचा मृत्यू झाल्यामुळे आरोग्य यंत्रणांसमोरचं टेन्शन वाढलेलं आहे.

ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाने आधीच निर्बंध लागू केले आहेत. परंतू तरीही रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून लॉकडाउनच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. ओमिक्रॉनची लागण झाली असली तरीही हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचं प्रमाण कमी होत असल्याचं चित्र काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. परंतू आजच्या घडीला Bed Occupancy rate हा १८ टक्क्यांपेक्षा पुढे गेला आहे.

ओमिक्रॉनचे वाढत जाणारे रुग्ण पाहता महापालिका प्रशासनाने सर्व कोविड सेंटर्ससह खासगी हॉस्पिटल्सनाही सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. याचसोबत मुंबईकरांनाही बाहेर पडताना गर्दी न करता मास्क वापरण्याचं आवाहन केलं जात आहे.

ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या लक्षणांबाबत वारंवार आरोग्य तज्ज्ञ माहिती देत आहेत. खोकला, ताप, नाक वाहणे, कफ ही चार लक्षणं आहेत. अशात आता एम्सने पाच लक्षणं सांगितली आहेत. तसंच ही लक्षणं दिसली तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा असंही एम्सने सांगितली आहेत.

काय आहेत पाच लक्षणं?

श्वास घेण्यासाठी त्रास होणं

ऑक्सिजनची पातळी सातत्याने कमी होणं

छातीत सातत्याने दुखणे, दबाव जाणवणे

मानसिक ताण, प्रतिक्रिया न देता येणं, व्यक्त न होता येणं

ही लक्षणं चार दिवसांपेक्षा जास्त असतील तर तातडीने डॉक्टरांकडे जा

आरोग्य तज्ज्ञांनी हे देखील सांगितलं आहे की त्वचा, ओठ, नखांचा रंग बदलला तरीही सावध व्हा. तातडीने डॉक्टरांकडे संपर्क साधा असंही सांगण्यात आलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button