breaking-newsताज्या घडामोडीपुणे

20 एप्रिलला होणार विषय समिती सदस्यांची निवड

  शिवसेना, राष्ट्रवादीने मागविले नगरसेवकांचे अर्ज

पिंपरी – महापालिकेच्या विविध विषय समिती सदस्यांची निवड शुक्रवारी (दि.20) सर्वसाधारण सभेत होणार आहे. याकरिता भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीने  इच्छुक नगरसेवकांचे अर्ज मागविले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधी समिती, शहर सुधारणा समिती, महिला व बाल कल्याण समिती आणि क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीच्या सदस्य पदाच्या नियुक्त्या 20 एप्रिल रोजी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत होणार आहेत. या सर्व समित्यांमध्ये सदस्यपदासाठी इच्छूक असणा-या नगरसेवकांकडून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना अर्ज मागविले आहेत. संबंधित इच्छूकांनी आपले अर्ज आपआपल्या पक्षाच्या कार्यालयात अर्ज आणून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button