breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

देशात २ लाख ७३ हजार नवे रुग्ण; १ लाख ४४ हजार रुग्णांची कोरोनावर मात

नवी दिल्ली – देशात कोरोनाच्या  रुग्णसंख्येत वाऱ्याच्या वेगाने वाढ होत जातेय. गेल्या २४ तासांत २ लाख ७३ हजार ८१० नवे रुग्ण सापडले असून १ हजार ६१९ बाधितांचा मृत्यू झाला आहे. तर, गेल्या २४ तासांत १ लाख ४४ हजार १७८ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. ही आकडेवारी अशीच वाढत राहिली तर संपूर्ण देशात पुन्हा लॉकडाऊन लावण्याचे संकेत देण्यात येत आहेत.

आजच्या नव्या रुग्णसंख्येमुळे एकूण बाधितांचा आकडा १ कोटी ५० लाख ६१ हजार ९१९ वर पोहोचला आहे. तर यामधून आतापर्यंत १ कोटी २९ लाख ५३ हजार ८२१ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. तर १ लाख ७८ हजार ७६९ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर, सध्या देशात १९ लाख २९ हजार ३२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.तर, १२ कोटी ३८ लाख ५२ हजार ५६६ नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं आहे.

वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णालयातील सुविधांवर प्रचंड ताण येऊ लागला आहे. बेड, आयसीयू बेड आणि ऑक्सिजनच्या तुटवड्यासह रेमडेसिवीर इंजेक्शनची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे दिल्ली, महाराष्ट्र, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश यासह काही राज्यातील परिस्थिती बिकट बनली आहे.

विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधानांशी पत्रव्यवहार केला जात आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ऑक्सिजन तुटवडा आणि इतर सुविधांकडे पंतप्रधानांचं लक्ष वेधलं आहे. तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी लसीकरणासंदर्भात केंद्र सरकारला पाच महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button