breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

देशात २ लाख ६८ हजार नवे रुग्ण; पॉझिटिव्हिटी रेट १६.६६ टक्क्यांवर

नवी दिल्ली |प्रतिनिधी

कोरोनाने आपले हातपाय फैलावले असून रोजच्या संख्येत कमालीची वाढ पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासात संपूर्ण देशात तब्बल २ लाख ६८ हजार ८३३ नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत.

गेल्या २४ तासात ४०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहेत ये १ लाख २२ हजार ६८४ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट १६.६६ टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान, देशात ओमायक्रॉन रुग्णसंख्या ६,०४१ वर पोहोचली आहे. सध्या देशात कोरोनाचे १४ लाख १७ हजार ८२० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

याआधीच्या चोवीस तासांमध्येच दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत ६.७ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली होती. गुरूवारी दिवसभरात २ लाख ६४ हजार २०२ कोरोनाबाधितांची भर पडली होती. तर, ३१५ रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला होता. दरम्यान १ लाख ९ हजार ३५४ रूग्णांनी कोरोनावर मात मिळवली. शुक्रवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९५.२० टक्के होता. बुधवारी दिवसभरात २ लाख ४७ हजार ४१७ कोरोनाबाधित आढळले होते.

संक्रमण दर २० टक्क्यांहून जास्त

देशात तिसर्‍या लाटेत ज्या वेगाने दैनंदिन रुग्णसंख्या वाढत आहे, त्यापेक्षा रुग्णसंख्या वाढीचा वेग देशातील मुंबई, दिल्लीसह २० महानगरांतून कितीतरी पटींनी जास्त आहे. या महानगरांत २० टक्क्यांहून अधिक संक्रमण दर आहे. या महानगरांत दर १०० चाचण्यांमागे २० जण कोरोना बाधित आढळत आहेत.

देशात दर लाख लोकसंख्येमागे १९ रुग्ण सध्या कोरोनाबाधित आढळत आहेत. दुसरीकडे दिल्लीतील गुरुग्राममध्ये दर लाख लोकसंख्येमागे १७९ रुग्ण आढळत आहेत. कोलकात्यात दर लाख लोकांमागे १५७, बंगळुरूला १६३, दिल्लीत १३९, तर मुंबईत १३२ जण बाधित आढळत आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button