breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबई विमानतळावर २ किलो सोन्याची पेस्ट जप्त

मुंबई – मुंबई विमानतळावर स्मगलिंगकरिता आणलेले तब्बल २ किलो सोने जप्त करण्यात आले आहे. हे सोने विमानाच्या सीटखाली ओल्या कचऱ्याच्या स्वरुपात ठेवण्यात आले होते. मुंबईतील कस्टम विभागाला या नव्या मोडस ऑपरेंडीची कल्पना आल्यावर त्यांनी योग्य ती पावले उचलून सोने जप्त करण्यात आले आहे. अबुधाबीतून मुंबईला आलेल्या इत्तेहाद एअरलाईन्सच्या विमानात तब्बल २ किलो सोन्याची पेस्ट ठेवण्यात आली होती.

विमानाच्या सीटखाली सेफ्टी जॅकेट्स ठेवलेले असतात, त्याठिकाणी हे सोने लपवून ठेवण्यात आले होते. एका व्यक्तीच्या पँटला या सोन्याची पेस्ट आतून लावण्यात आली होती. मात्र पोलिसांनी या व्यक्तीला पकडून सोने जप्त केले. अबुधाबीहून एका प्रवाशाने हे सोने आणले होते आणि विमानाच्या सीटखाली लपवून ठेवण्यात आले होते. विमानाची साफसफाई करण्याकरिता येणाऱ्या स्टाफपैकी कोणीतरी हे सोने विमानातून बाहेर काढणार होता.

आतापर्यंतच्या मोडस ऑपरेंडीनुसार या कटात सहभागी असणारा सफाई कर्मचारी ते सोने विमानातून बाहेर काढत असे, ती ओली पेस्ट आपल्या ट्राऊझरला लावत असे आणि विमानतळावरून आपली ड्युटी संपवून बाहेर येत असणार. विमानतळ समन्वयाच्या माध्यमातून अबुधाबीतून पेस्टच्या स्वरुपातील सोने भारतात येत असल्याची टीप कस्टम विभागाला मिळाली होती. यानुसार त्यांनी सापळा रचला होता. आपल्या ट्राऊझरच्या आतमध्ये सोन्याची पेस्ट लावून बाहेर पडणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी तपासले असता त्याला अटक करण्यात आले आहे. विमानातील स्टाफ आणि विमानतळावरचा स्टाफ या दोन्ही ठिकाणचे कर्मचारी या कटात सहभागी असणार, असा संशय कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांना आहे. चोरीचा हा पॅटर्न कस्टम विभागाने शोधून काढून पकडला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button