breaking-newsराष्ट्रिय

2 आमदारांना येडियुरप्पांच्या मुलाने डांबले – काँग्रेसचा आरोप

बंगळुरु:मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांची आज कर्नाटक विधानसभेत अग्निपरीक्षा आहे. कारण सुप्रीम कोर्टाने झटका देत येडियुरप्पांना आज दुपारी 4 वाजता बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. 224 जागांच्या कर्नाटक विधानसभेच्या 222 जागांसाठी निवडणूक झाली. यामध्ये भाजपला 104, काँग्रेसला 78, जेडीएस 38 आणि अन्य 2 जागा मिळाल्या आहेत. बहुमताचा आकडा 112 इतका आहे.

यातच येडियुरप्पांच्या मुलाने बंगळुरुतील हॉटेलवर दोन आमदारांना डांबून ठेवले आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे. दरम्यान, काँग्रेस आमदाराशी बोलताना येडियुरप्पांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. काँग्रेसकडून ही ऑडिओ क्लिप जारी करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button