breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

197 उमेदवारांनी दिली समुह संघटक पदासाठी परीक्षा

  • अत्यंत शिस्तप्रिय वातावरणात पार पडली परीक्षा
  • समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांनी केले नियंत्रण

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागातील समुह संघटक पदासाठी आज अत्यंत शिस्तप्रिय वातावरणात परीक्षा पार पडली. समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांच्या नियंत्रणाखाली घेण्यात आलेल्या परीक्षेत 330 उमेदवारांपैकी 197 जणांनी परीक्षा दिली. तर, 133 उमेदवार गैरहजर राहिले.

महापालिकेच्या कल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोचविण्यासाठी नागरवस्ती विकास योजना विभागात समुह संघटकांची 20 पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पालिकेने अर्ज मागविले होते. एकूण 711 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले होते. अर्जांच्या छानणी प्रक्रियेत 330 अर्ज पात्र ठरले. त्यांना परीक्षा देण्यासाठी प्रवेशपत्रिका पाठविण्यात आल्या होत्या. आज त्यांची शंभर गुणांची परीक्षा घेण्यात आली. पात्र ठरलेल्या 330 उमेदवारांपैकी 197 उमेदवार परीक्षेला हजर होते. 133 उमेदवार गैरहजर होते, असे ऐवले यांनी सांगितले.

आज सकाळी 11 ते 12 या वेळेत महापालिकेच्या मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू माध्यमिक विद्यालय, खंडोबा माळ, आकुर्डी चौक याठिकाणी शिस्तप्रिय वातावरणात परीक्षा पार पडली. उमेदवारांचे ओळखपत्र (आधार कार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट आदी फोटो आयडी) तपासून त्यांचे टेम्प्रेचर नोंदीत करून सॅनिटायझर आणि मास्क लावून त्यांना परीक्षा हॉलमध्ये प्रवेश देण्यात आला. सोशल डिस्टंसिंग नियमांचे पालन करून उमेदवारांची बैठक व्यवस्था केली होती, अशी माहिती ऐवले यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button