breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबईराष्ट्रिय

देशात 24 तासात कोरोनाचे 1,94,720 नवीन रुग्ण

मुंबई | प्रतिनिधी 
कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये पुन्हा एकदा मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 1,94,720 नवीन रुग्ण आढळले आहेत. देशातील कोरोनाचा संसर्ग दर 11.05 टक्क्यांवर गेला आहे. नवीन व्हेरिएंटचा विचार केल्यास देशात ओमिक्रॉनची रुग्णसंख्या 4868 वर गेली आहे. त्यापैकी सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्र आणि राजस्थानमधील आहेत.

चाचणीबद्दल बोलताना, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (ICMR) मते, मंगळवारी भारतात कोरोना विषाणूसाठी 17,61,900 सॅम्पल टेस्ट करण्यात आल्या, कालपर्यंत एकूण 69,52,74,380 सॅम्पल टेस्ट करण्यात आल्या आहेत.

भारतात गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूचे 1,94,720 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 60,405 जण बरे झाले आहेत. पण देशभरात 442 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

एकूण रुग्ण: 3,60,70,510

अॅक्टिव्ह रुग्ण : 9,55,319

एकूण बरे झालेले रुग्ण: 3,46,30,536

एकूण मृत्यू: 4,84,655

एकूण लसीकरण: 1,53,80,08,200

Omicron चे रुग्ण: 4,868

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button