मुंबई – माझ्या शरीरात प्राण असेपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या रिपब्लिकन पक्षाचे नाव जिवंत ठेवणार आहे. रिपब्लिकन पक्षाच्या नावाला डाग लागू देणार नाही. अशी शपथ रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी घेतली आहे.
वाचा :-नवाब मलिक यांच्या जावयाच्या घरात एनसीबीचे छापे
आठवले म्हणाले की, “राज्यातील नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत बदल करताना केवळ विरोधी पक्षांच्या नेत्यांचीच सुरक्षा व्यवस्था काढून घेण्याची,कपात करण्याची राज्य सरकारची भूमिका दुजाभाव करणारी आणि अन्यायकारक आहे. माझी सुरक्षा कमी केली तरी माझ्या कामात काही फरक पडणार नाही आणि माझे काम कुठेही थांबणार नाही.”
तसंच, मुंबई रिपब्लिकन पक्षाच्या ताकदीने झोपड्यांना अभय देण्याचे काम आम्ही केले. झोपड्यांच्या जागी आता एसआरए मुळे इमारती उभ्या राहिल्या आहेत. एसआरए योजनेत ५५० फूट बिल्ट अप एरिया चे घर द्यावे ही रिपाइं ची मागणी असल्याचंही आठवले यांनी सांगितलं आहे.