करोनाच्या ब्रिटन स्ट्रेनने बाधितांची संख्या वाढून आता 102 वर पोहोचली आहे, असे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले.
या सर्व बाधितांना स्वतंत्र खोलीत विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर संबंधित राज्य सरकारांकडून उपचार करण्यात येत आहेत. त्यांच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींनाही विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
त्यांच्या बरोबर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा शोध सुरू असल्याचे आरोग्य मंत्रालयाच्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 जानेवारीपासून देशभरात कोरोना लसीकरण मोहीमेला सुरुवात करणार आहेत. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी को विन अॅपची देखील सुरूवात करणार आहेत. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमधून कोविशील्ड लसीची पहिली बॅच रवाना झाली आहे.