नववर्षाचे स्वागताला पुण्यात गालबोट लागले आहे. येथील कोथरूड परिसरात एका टोळक्याने गाड्यांची तोडफोड अन् जाळपोळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कोथरूड परिसरातील सुतारदरा परिसरात दोन दुचाकींचा जाळपोळ करण्यात आली तर काही चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली.
सुतारदरातील शिवशक्ती नगर येथे टोळक्याकडून एक शाळेचे व्हॅन, दुचाकी आणि आणखी काही चार चाकी वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ केली. तसेच तीक्ष्ण हत्याराने वार करून अनेक दुचाकी वाहनांचे नुकसान केले.
वारंवार होणाऱ्या अशा घटना यामुळे सुतारदरा येथील स्थानिक नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत. अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी या ग्रामस्थांनी केली आहे.