माधेपूर – माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीनच्या कारला राजस्थानातील सवाई माधेपूर येथे अपघात झाला आहे. मोहम्मद अझरुद्दीन यांची कार उलटली. या अपघातातून अझरुद्दीन थोडक्यात बचावले आहेत. लालसोट कोटा मेगा हायवेवर असलेल्या सुरवाल पोलीस ठाण्याजवळ हा अपघात झाला आहे. अझरुद्दीन त्यांच्या कुटुंबीयांसह रणथंबोरला जात होते. अझरुद्दीन यांच्यासोबत आलेल्या एका व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली आहे. अझरुद्दीन यांना दुसऱ्या कारने हॉटेलमध्ये नेण्यात आले आहे.
वाचा :-#INDvsAUS 3rd test: तिसरी कसोटी सिडनीत होणार