पिंपरी | टीम ऑनलाईन
आजपासून देशाच्या कानाकोपऱ्यात कोरोना लस पोहोचण्याची तयारी सुरु होणार आहे. पंजाब, आसम, आंध्र प्रदेश आणि गुजरातमध्ये कोरोना लसीकरणाच्या तयारीच्या आढावा घेण्यासाठी दोन दिवसांचा ड्राय रन करण्यात येणार आहे. या चार राज्यांच्या पाच ठिकाणी ड्राय रन केलं जाणार आहे. लसीकरणाआधी सर्व तयारीचा आढावा घेणं किंवा त्रुटी असतील तर त्या दूर करणं हा या ड्राय रनचा उद्देश आहे. सोबत प्लॅनिंग, इम्प्लिमेन्टेशन किंवा रिपोर्टिंग मेकॅनिजम पाहण आणि त्यात सुधारणा करणं हा देखील उद्देश या ड्राय रनचा आहे. ड्राय रनमध्ये कोरोना लसीसाठी कोल्ड स्टोअरेज आणि वाहतुकीची व्यवस्था, परीक्षण स्थळांवर गर्दीची व्यवस्था, सोशल डिस्टन्स यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश आहे.
यावेळी लस देण्यासाठी प्रामुख्याने तयार केलेलं कोविन अॅपची ऑपरेशनल फीसिबिलिटी, फील्ड प्लॅनिंग आणि इम्प्लिमेन्टेशन तपासचं जाईल. ही एक रंगीत तालीम असेल. लसीकरणाच्या वेळी जे केलं जातं ते सगळं यावेळी केलं जाईल, पण लस मात्र दिली जाणार नाही. या ड्राय रनमध्ये चारही राज्यांत मिळून एकूण 125 आरोग्य सेवक लसीकणाचे लाभार्थी म्हणून सहभाही होणार आहेत. ही ड्राय रन नोंदणी, मायक्रोप्लॅनिंग आणि प्रत्यक्ष लसीकरणाचं ड्राय रन या तीन टप्प्यांमध्ये होईल. या ड्राय रन मध्ये केंद्र सरकारच्या गाईडलाईन्सआधारे राज्य आणि जिल्हा टास्क फोर्स सहभागी होतील. चार राज्यांतील ड्राय रन जिल्हा हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज इथे राबवली जाईल.