- मुंबईत 745, पुण्यात 621 नवे रुग्ण
मुंबई – बुधवारी दिवसभरात आढळलेल्या 3,913 नव्या कोरोना रुग्णांमुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 19,06,371 वर पोहोचली आहे. तर एका दिवसात 7,620 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने आणि 93 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावल्याने राज्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 18,01,700 इतकी झाली असून कोरोनाबळींचा आकडा 48,969 वर पोहोचला आहे. तर सध्या 54,573 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबई आणि पुण्याला बसला आहे. मुंबईत बुधवारी कोरोनाचे 745 नवे रुग्ण आढळले, तर 14 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या 2,88,561 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 11,033 इतका झाला आहे. तसेच काल 286 जणांनी कोरोनावर मात केल्याने मुंबईत आतापर्यंत 2,68,583 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या 8,093 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
तसेच दररोज 2 हजारांहून अधिक रुग्ण आढळणाऱ्या पुणे जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून दिवसभरातील नव्या रुग्णांच्या संख्येत प्रचंड घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल दिवसभरात पुण्यात 621 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर 9 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 3.68 लाखांवर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 7,743 इतका झाला आहे. तसेच पुण्यात आतापर्यंत 3.47 लाख व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर सध्या 13,267 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, काल आढळलेल्या 621 नव्या रुग्णांमध्ये पुणे शहरातील 328, पिंपरी-चिंचवडमधील 134 आणि ग्रामीण भागातील 159 रुग्णांचा समावेश आहे.