पिंपरी । प्रतिनिधी
पहिल्या पत्नीचे निधन झाल्याचे खोटे सांगून आणखी तीन लग्न करणाऱ्यावर भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक झालेल्यांमध्ये एका महिला पोलिसाचा समावेश आहे. हा प्रकार सन २०१३ ते २० डिसेंबर २०२० या दरम्यान घडला.
याप्रकरणी रविवारी (दि. २०) भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे. आरोपीने त्याची पहिली पत्नी मयत झाली आहे, असे खोटे सांगून फिर्यादी महिलेसोबत सन २०१४ मध्ये लग्न केले. त्यानंतर त्याने अशाच पद्धतीने आणखी दोन महिलांसोबत लग्न केले. तसेच, आरोपीने लग्राच्या अगोदर आणि लग्नानंतर फिर्यादीचा छळ करीत जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास भोसरी पोलिस करीत आहेत.