पुणे – पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात चोरट्यांचा धुमाकूळ सूरु असताना चोरट्यांनी काल मध्यरात्री जुन्नर तालुक्यातील सावरगाव येथे पाच दुकानं फोडली. या दरोड्यामुळे पुन्हा एकच खळबळ उडाली असून हा चोरीचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. मात्र चोरट्यांनी तोंडावर कापड बांधल्याने त्यांची ओळख पटवण्यात अडचणी येत आहेत.
पुणे ग्रामीण भागात चीरीच्या घटनामुळं नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलीस चोरीच्या घटना रोखण्यासाठी प्रयत्न करत असताना काल मध्यरात्री चोरट्यांनी जुन्नर तालुक्यातील सावरगाव येथील बाजारपेठमधील किराणामाल दुकान, खत-औषधे, कटलरी स्टेशनरी, पान स्टॉल अशी पाच दुकानं फोडून लाखो रुपयांच्या वस्तू व मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. या चोरीचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दिवसेंदिवस चोरट्यांची दहशत वाढत असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. त्यामुळे या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याचं आव्हान पुणे ग्रामीण पोलिसांसमोर आहे.