तामिळनाडू राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. दक्षिणात्य सुपरस्टार कमल हसन पुढील निवडणूक लढवणार असल्याचे घोषित केले आहे. कमल हसन कोणत्या मतदारसंघातून निवडणूकीस उभे राहतील हे अजून गुलदस्त्यातच आहे. हसन हे मक्कल निधी मईम Makkal Needhi Maiam (MNM) या राजकीय पार्टीचे अध्यक्ष आहेत. तामिळनाडूत मदुराई येथे 21 फेब्रुवारी 2018 रोजी त्यांनी पार्टीचे अनावरण केले होते.
कमल हसन यांच्या या निर्णयामुळे तामिळनाडूचे राजकीय वातावरण येत्या पुढील काळात चांगलेच रंगात येणार असेच दिसून येत आहे.