सिहोर – भाजपाच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर आता एका नव्या वादात सापडण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशातील एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी जातीव्यवस्थेबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वाद पेटू शकतो.
वाचा :-स्वत:हून संबंध ठेवल्यानंतर मुलीच बलात्काराची तक्रार करतात, महिला आयोगाच्या अध्यक्षांचं मोठ वक्तव्य
एका कार्यक्रमादरम्यान बोलताना प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी वर्ण व्यवस्थेवरून प्रश्न उपस्थित केला. यावेळी त्यांनी जर शुद्राला शुद्र म्हटलं, तर वाईट वाटतं, असं विधान केलंय.दरम्यान या गोष्टी जातीव्यवस्थेसंदर्भात गैरसमजूती असल्याने घडत आहेत असंही प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्यात