पिंपरी / महाईन्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत कोरोना विषाणुने संक्रमित होणा-यांची संख्या घसरत आहे. ही दिलासादायक बातमी असली तरी नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. आज 172 जणांना कोरोनाची लागन झाली. काल रविवारी (दि. 29) 192 बाधितांची नोंद होती. तर, परवा शनिवारी (दि. 28) संक्रमितांचा आकडा 217 वर होता. दिवसेंदिवस ही संख्या कमी होताना दिसत आहे.
आज दिवसभरात 172 कोरोना बाधित व्यक्तींची नोंद झाली आहे. तर, या भयंकर विषाणुचा अतिप्रादुर्भाव झाल्याने पिंपरी-चिंचवडच्या दापोडी येथील एका ज्येष्ठ व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर, शहराबाहेरील म्हणजे हिंजवडी येथील एका 50 वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
थंडीमुळे संक्रमण वाढण्याची भिती महापालिका प्रशासनाने वर्तविली होती. त्यानंतर संक्रमितांच्या संख्येत वाढ झाली. गेल्या दोन दिवसांपासून हा आकडा कमी होत आहे. काल रविवारी (दि. 29) 192 बाधितांची नोंद झाली. परवा शनिवारी (दि. 28) संक्रमितांची 217 नोंद होती. आज दिवसभरात 172 पॉझीटिव्ह आढळले आहेत.
महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या पथकाने 1 हजार 241 घरांना भेटी दिल्या. त्यामध्ये 4 हजार 94 नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 172 जणांचा कोरोनाची लक्षणे आढळ्याने त्यांना वैद्यकीय सल्ला घेऊन औषधोपचाराखाली येण्याचा सल्ला देण्यात आला आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.