breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमराठवाडा

1500 स्क्वेअर फुटांपर्यंत घर बांधणा-यांना परवानगीची आवश्यकता नाही

  • नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

औरंगाबाद |महाईन्यूज|

राज्यात 1500 स्क्वेअर फुटांपर्यंत (1500 Square feet) घर बांधण्यासाठी कसल्याही परवानगीची आवश्यकता भासणार नाही, अशी घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या घर बांधण्याचा विचार करणाऱ्या लोकांचा सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याचा त्रास वाचणार आहे. ही घोषणा राज्याचे नगरविकास मंत्री (Minister for Urban Development) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली आहे. ते औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी औरंगाबाद महापालिकेच्या हद्दीत सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेतला.

यावेळी त्यांनी म्हटलं की, ’31 डिसेंबर 2020 पर्यंतची सर्व बांधकामं नियमित होतील. त्याचबरोबर येथून पुढे जर 1500 स्क्वेअर फुटापर्यंत घर बांधायचं असले तर महापालिकेच्या परवानगीची गरज भासणार नाही.’ नगरविकास विभागाच्या या निर्णयामुळे अनेक छोट्या ग्राहकांचा सरकारी कार्यालयात हेलपाटे मारण्याचा त्रास वाचणार आहे. याचा फायदा राज्यातील 55 हजार कुटुंबांना फायदा होणार आहे. याव्यतिरिक्त 3 हजार स्क्वेअर फूटपर्यंत घरं बांधणाऱ्यांसाठी 10 दिवसांत परवानगी देण्यात येणार असल्याचंही त्यांनी त्यांनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button