TOP Newsपिंपरी / चिंचवड

Pimpri : पिंपरी चिंचवड शहरात ओमायक्रॉनचे नवीन 15 रुग्ण

पिंपरी | प्रतिनिधी

ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झालेले 15 नवीन रुग्ण आज (रविवारी) पिंपरी-चिंचवड शहरात आढळले. विदेशातून आलेल्या आणि त्यांच्या संपर्कातील रुग्णांचा यात समावेश आहे.

आफ्रिका आणि युरोपीय देशांमध्ये ओमायक्रॉन या नव्या उत्परिवर्तित विषाणूचा प्रादुर्भाव होत आहे. केंद्र व राज्य शासनाने खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सूचित केले आहे. त्यानुसार महापालिकेकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटच्या अनुषंगाने महापालिकेतर्फे तपासणी मोहीम सुरू आहे. आज शहरात ओमायक्रॉनचे नवीन 15 रुग्ण आढळले. या रुग्णांची प्रकृती स्थिर असून रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

आजपर्यंत परदेशातून शहरात आलेले व त्यांच्या संपर्कातील अशा 1879 जणांची तपासणी करण्यात आली. त्यातील 1824 जणांचे अहवाल प्राप्त झाले. परदेशातून आलेले 57 तर त्यांच्या संपर्कातील 34 जण पॉझिटीव्ह आले. तर, 1733 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले. परदेशातून आलेल्या 57 पॉझिटीव्ह रुग्णांपैकी 31 जणांना ओमायक्रॉनची बाधा झाली. संपर्कातील 34 पॉझिटीव्ह रुग्णांपैकी 16 ओमायक्रॉन पॉझिटीव्ह होते. तर, रँन्डम तपासणीत 14 रुण ओमायक्रॉन पॉझिटीव्ह आले आहेत. 33 जण ओमायक्रॉन संसर्गमुक्त झाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button