पिंपरी / चिंचवडपुणे

चोरीच्या पाच घटनांमध्ये 15 लाखांचा ऐवज चोरीला

पिंपरी l प्रतिनिधी

वाकड, चाकण, आळंदी आणि एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. 21) चोरीच्या पाच गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. या घटनांमध्ये अज्ञात चोरट्यांनी तब्बल 14 लाख 92 हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.

वाकड पोलीस ठाण्यात वाहन चोरीचा गुन्हा दाखल आहे. फिर्यादी योगेश गणेश सीतापूरे (वय 22, रा. थेरगाव) यांची एक लाख 60 हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरासमोरून चोरून नेली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

चाकण पोलीस ठाण्यात चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत. पहिल्या गुन्ह्यात निलेश संतोष राठोड (वय 23, रा. खराबवाडी, ता. खेड) यांची 80 हजार रुपये किमतीची दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली आहे. तर दुस-या घटनेत सुनील मारुतवार शेळके (वय 34, रा. बोराडेवाडी, मोशी) यांच्या सुदर्शन ऑटो इंजिनिअरिंग या कंपनीत अज्ञात चोरट्यांनी गज वाकवून स्टोअर रूममध्ये प्रवेश केला. स्टोअर रूममधील रॅकवर ठेवलेले कॉपर ट्यूब मटेरियल 11 लाख 37 हजार 131 रुपयांचा माल चोरून नेला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

आळंदी आणि एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात सायलेन्सर चोरीच्या दोन घटना उघड झाल्या आहेत. ओंकार चंद्रकांत दौंडकर (वय 22, रा. शेलपिंपळगाव, ता. खेड) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या घराजवळ पार्क केलेल्या त्यांच्या मामाच्या इको गाडीचा 75 हजारांचा सायलेन्सर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

तुषार प्रभाकर घोलप (वय 37, रा. शाहूनगर, चिंचवड) यांनी त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केलेल्या त्यांच्या इको गाडीचा 40 हजार रुपयांचा सायलेन्सर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button