ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

व्हाट्स अपद्वारे ओळख वाढवून तरुणाला 14 लाखांचा गंडा

पिंपरी चिंचवड | एका महिलेने चिखली येथील तरुणासोबत व्हाट्स अपद्वारे ओळख वाढवली. ती पोलंड येथील असून ती भारतात फिरण्यासाठी येत असल्याचा बनाव करून महिलेने आणि तिच्या साथीदारांनी मिळून तरुणाला 14 लाख 32 हजार 279 रुपयांचा गंडा घातला. हा प्रकार 12 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत जाधववाडी, चिखली येथे घडला.अखिला प्रदीप, अंकिता शर्मा, अमित कुमार (रा. जाकीरनगर, दिल्ली), आणि शर्मा (बस्तीहजरात निजामुद्दीन वेस्ट, नवी दिल्ली), अनिल शर्मा (रा. नवी दिली), +48732232181, +918586964182 या मोबाईल क्रमांक धारकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संगमेष मडीवालप्पा वटगे (वय 32, रा. जाधववाडी, चिखली) यांनी सोमवारी (दि. 15) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अखिला प्रदीप या महिलेने फिर्यादीसोबत ओळख करून +48732232181 या क्रमांकावरून व्हाट्सअप द्वारे ओळख वाढवली. अखिला हिने भारतात फिरण्यासाठी येत असल्याचा बनाव केला. अंकिता शर्मा या महिलेने फिर्यादीस +918586964182 या क्रमांकावरून फोन करून ‘मी कस्टम ऑफिसर दिल्ली येथून बोलत आहे. अखिला प्रदीप या महिला दिल्ली विमानतळावर आल्या असून त्यांच्याकडे दोन लाख पौंड कॅश मिळाली आहे. ही कॅश बाळगणे अनधिकृत असल्याने त्यासाठी एक लाख 38 हजार 750 रुपये दंड भरावा लागेल’ असे फिर्यादीस सांगितले. फिर्यादी यांनी तो दंड भरला.

त्यांनतर अंकिता व अखिला यांनी मिळून अखिला हिच्या पासपोर्ट व ओळखपत्रातील नावामध्ये बदल असल्याचे सांगून त्यासाठी सात लाख 24 हजार 530 रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. फिर्यादी यांनी तेवढे देखील पैसे भरले.

आरोपी एवढ्यावर थांबले नाहीत. त्यानंतर अंकिता शर्मा हिने दोन लाच पौंड कॅश हे ट्रॅन्जेक्शन इंटरनॅशल आहे. त्यासाठी इंटरनॅशनल मॉनिटरी फंडची मान्यता पाहिजे. त्या मान्यतेसाठी पाच लाख 68 हजार 999 रुपये भरावे लागतील. पैसे दिल्यानंतर इंटरनॅशनल मॉनिटरी फंडकडून सिक्युरिटी कोड दिला जाईल. तो टाकल्यानंतर तुझ्या अकाउंटला दोन लाख पौंड ही रक्कम ट्रान्सफर होईल, असे सांगितले असता फिर्यादी यांनी ती रक्कमही भरली. फिर्यादी यांनी आरोपी अमित कुमार, अनिल शर्मा, अनिल शर्मा नावाचा दुसरा व्यक्ती अशा तीन बँक खात्यांवर एकूण 14 लाख 32 हजार 279 रुपये भरले. आरोपींनी फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button