14 वर्षांखालील टेनिस स्पर्धा : रुमा गायकैवारी, दक्ष अगरवाल, मानस धामणे, ओमांश सहारिया यांचे सनसनाटी विजय

एमएसएलटीए केपीआयटी अरुण वाकणकर मेमोरियल एटीएफ आशिया 14 वर्षांखालील टेनिस स्पर्धा
पुणे – मुलींच्या गटात रुमा गायकैवारी हिने, तर मुलांच्या गटात दक्ष अगरवाल, मानस धामणे व ओमांश सहारिया या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर सनसनाटी मात करताना एमएसएलटीए केपीआयटी अरुण वाकणकर मेमोरियल एटीएफ आशिया 14 वर्षांखालील टेनिस स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत प्रवेश केला. पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) यांच्यातर्फे अरुण वाकणकर यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. म्हाळुंगे बालेवाडी येथील एमएसएलटीए स्कूल ऑफ टेनिस येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुलींच्या उपान्त्यपूर्व फेरीत रुमा गायकैवारी हिने आपली अनपेक्षित निकालाची मालिका कायम ठेवत अव्वल मानांकित परी सिंगचा 3-6,6-2,6-4 असा तीन सेटमध्ये पराभव करून उपान्त्य फेरीत धडक मारली. तसेच चौथ्या मानांकित वेदा प्रापुर्नाने पाचव्या मानांकित नंदिनी दीक्षितचा 6-3, 6-1 असा पराभव करून आगेकूच केली.
मुलींच्या गातील आणखी एका सामन्यात तिसऱ्या मानांकित श्रुती अहलावटने कॅनडाच्या सहाव्या मानांकित अबिनाया स्वीतनवर 6-1, 6-0 असा विजय मिळवला. तर सोनल पाटीलने सायना देशपांडेचा 6-2, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव करताना उपान्त्य फेरी गाठली. मुलांच्या गटात पाचव्या मानांकित दक्ष अगरवाल याने अव्वल मानांकित शिवम कदमचा 6-3, 6-0 असा पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद केली. तसेच मानस धामणेने चौथ्या मानांकित नितीश नल्लूस्वामीचा टायब्रेकमध्ये 7-6 (5),2-6, 6-1 असा पराभव करून आगेकूच केली. आणखी एका खळबळजनक निकालाची नोंद करताना ओमांश सहारियाने दुसऱ्या मानांकित क्रिषाग रघुवंशीवर 7-5, 6-3 असा विजय मिळवला.
मुलांच्या दुहेरीतील उपान्त्यपूर्व फेरीत कनव दवेर व स्पर्श परमार यांनी प्रणव गाडगीळ व जैश्णव शिंदे यांचा 5-7, 6-4, 10-4 असा, तर दक्ष अगरवाल व मानस धामणे यांनी जोशुआ ईपन व अर्णव उरूगंती यांचा 6-1, 6-2 असा पराभव करून उपान्त्य फेरी गाठली.
सविस्तर निकाल-
चौदा वर्षांखालील मुले – उपान्त्यपूर्व फेरी – दक्ष अगरवाल (भारत-5) वि.वि. शिवम कदम (भारत-1) 6-3, 6-0, मानस धामणे (भारत) वि.वि. नितीश नल्लूस्वामी (भारत-4) 7-6 (5),2-6,6-1, ओमांश सहारिया (भारत) वि.वि. क्रिषाग रघुवंशी (भारत-2)7-5, 6-3, अनर्घ गांगुली (भारत-3) वि.वि. जोश मॅन्युएल (ग्रेट ब्रिटन-6) 6-1, 6-2, चौदा वर्षांखालील मुली – उपान्त्यपूर्व फेरी – रुमा गायकैवारी (भारत) वि.वि. परी सिंग (भारत-1) 3-6,6-2,6-4, वेदा प्रापुर्ना (भारत-4) वि.वि. नंदिनी दीक्षित (भारत-5) 6-3, 6-1, श्रुती अहलावट (भारत-3) वि.वि. अबिनाया स्वीतन(कॅनडा-6) 6-1, 6-0, सोनल पाटील(भारत) वि.वि. सायना देशपांडे (यूएसए) 6-2, 6-3
चौदा वर्षांखालील मुले दुहेरी – उपान्त्यपूर्व फेरी – शिवम कदम (भारत-1)-नितीश नल्लूस्वामी (भारत) वि.वि. अश्विन मनिकंदन (भारत)-विनीत मुत्याल (भारत) 6-3, 6-3, कनव दवेर (भारत)-स्पर्श परमार (भारत) वि.वि प्रणव गाडगीळ (भारत-4)-जैश्णव शिंदे (भारत) 5-7, 6-4, 10-4, दक्ष अगरवाल (भारत-3)-मानस धामणे (भारत) वि.वि. जोशुआ ईपन (भारत)-अर्णव उरूगंती (भारत) 6-1, 6-2, समर मल्होत्रा (भारत-2)-क्रिषाग रघुवंशी (भारत) वि.वि. सिध्दार्थ मराठे (भारत)-आर्यन सुतार (भारत) 6-1, 6-4, चौदा वर्षांखालील मुली दुहेरी – उपान्त्यपूर्व फेरी – हेतवी चौधरी (भारत-1)-परी सिंग (भारत) वि.वि. नंदिनी दीक्षित (भारत)-मधुरिमा सावंत (भारत) 6-3, 6-1, नुपुर गुप्ता (भारत)-काश्वी थापलियाल (भारत) वि.वि. गौरी माणगावकर (भारत)-सलोनी परीदा 6-2, 6-0, सायना देशपांडे (यूएसए)-सोनल पाटील (भारत) वि.वि. कशिष बोटे (भारत)-रिजूल सिदनाळे 6-4, 6-3
श्रुती अहलावत (भारत-)-वेदा प्रापुर्णा (भारत) वि.वि. तमन्ना साईनी (भारत)-खुशी शर्मा 6-4, 6-2.